कुत्र्यावर अितप्रसंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
#नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता राजधानीत कुत्र्यावरील बलात्काराच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटनेतदेखील वाढ झाली आहे. मात्र आता राजधानी दिल्लीमधून एक नवीनच प्रकरण समोर आले आहे. इथे एका भटक्या कुत्र्यावर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
ही घटना दिल्लीतील हरिनगर भागात घडली असून, प्रकरणाचा तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका उद्यानात कुत्र्यावर बलात्कार करण्यात आला होता. जेव्हा हा माणूस एका मादी कुत्र्यावर बलात्कार करत होता तेव्हा कोणीतरी त्याचा व्हीडीओ बनवला. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी २५ फेब्रुवारी रोजी हरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रविवारी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी कलम ३७७/ ११ आणि प्राणी छळ कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा व्हीडीओ कधीचा आहे आणि मुक्या प्राण्यावर अत्याचार करणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान या पूर्वीही उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातून असंच प्रकरण समोर आले होते. इथे एका व्यक्तीने मादी कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. जेव्हा तो माणूस हे घृणास्पद कृत्य करत होता तेव्हा त्याच्या सुनेनेच त्याचा व्हीडीओ बनवला होता.