नवा इतिहास!
१३ हजार ८६२ फूट उंचीवरील पॅगॉंग त्सो येथे २१ कि.मी. अंतराची लास्ट रन नावाची हाफ मॅरेथॉन घेऊन केंद्रशासित लडाखने एक नवा इतिहास रचला. याची गीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. भारत-चीन सीमेवरील ७०० कि.मी.च्या भागावर पसरलेल्या पॅगॉंग तलावाच्या परिसरात हिवाळ्यात उणे ३० डिग्री तापमान असल्याने तलावातील पाणीही बर्फ बनलेले असते. या स्पर्धेत ७५ जणांनी भाग घेतला आणि कोणीही जखमी झाले नाही हे विशेष. चार तासांची ही मॅरेथॉन लुकूंग येथे सुरू झाली आणि मान येथे संपली.