नीरज बजाज यांचा २५२ कोटींचा ट्रीप्लेक्स
#मुंबई
बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी मुंबईत समुद्र किनारी एक ट्रीप्लेक्स पेंट हाऊस खरेदी केले आहे. आलिशान अशा मलबार हिलच्या भागात हा ट्रीप्लेक्स असून त्याच्या खरेदीची रीअल इस्टेट सेक्टरमध्ये चर्चा सुरू आहे. नीरज बजाज यांनी खरेदी केलल्या ट्रीप्लेक्सची किमत २५२.६ कोटी एवढी आहे. अलीकडच्या काळातील रीअल इस्टेट सेक्टरमधील हा मोठा विक्री व्यवहार म्हणावा लागेल.
होम सर्च पोर्टलच्या माहितीनुसार बजाज यांनी ही खरेदी लोढा ग्रुपच्या माध्यमातून केली आहे. ट्रीप्लेक्सच्या खरेदीचा करार १३ मार्च २०२३ रोजी झाला आहे. फोर्ब्जच्या माहितीनुसार नीरज बजाज हे हॉरवर्ड बिझनेस स्कूलचे पदवीधर असून बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाबरोबर बजाज ॲलाइन्झ लाईफ, जनरल इन्शुअरन्स या दोन्ही कंपन्यांच्या संचाक मंडळावर आहेत. होम सर्च पोर्टलच्या माहितीनुसार या तीन फ्लॅटची एकत्रित जागा १८ हजार ८ चौरस फूट एवढी आहे. लोढा मलबार पॅलेसच्या २९, ३० आणि ३१ व्या मजल्यावर हे फ्लॅट असून त्याची स्टॅम्प ड्यूटी १५ कोटी १५ लाख एवढी भरली गेली.
बजाज समुहाची स्थापना जमनालाल बजाज यांनी १९२६ मध्ये केली होती. दुचाकी, अर्थसेवा, इलेक्ट्रीकल अशा विविध क्षेत्रात या समुहाचे विविध ४० उद्योग आहेत. गेल्या महिन्यात वेलस्पन समुहाचे अध्यक्ष बी.के.गोएंका यांनी एक पेंट हाऊस २३० कोटीला विकत घेतले होते. हे अपार्टमेंट वरळी भागात होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने ४८ कोटीला एक आलीशान अपार्टमेंट घेतले होते. ही प्रापर्टीत इंडिया बुल्सच्या ब्ल्यू प्रोजेक्टमध्ये आहे. तिने ही प्रॉपर्टी कॅलिएस लॅण्ड डेव्हलपरकडून विकत घेतली होती. त्याचे क्षत्रफळ ५ हजार ३८४ चौरस मीटर एवढे होते. त्याच्यासमवेत सात कार पार्किंगही मिळाले होते. एड्युटेक फर्म टॉपर कॉमचे झिशान हयात यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये
४१ कोटीला एक पॉपर्टी रुस्तमजी यांच्याक़डून विकत घेतली होती. वृत्तसंस्था