स्वप्नात मुलायम अन् तेज प्रताप सायकलवर!

राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे बडे पुत्र आणि बिहारमध्ये मंत्री असलेले तेज प्रताप यादव कधी काय करतील किंवा कधी काय बोलतील याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही. पर्यावरणाबाबत सजग असलेल्या तेज प्रताप यांनी बुधवारी सायकलवरून सचिवालय गाठले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या स्वप्नात सायकल चिन्ह असलेल्या समाजवादी पक्षाचे दिवंगत अध्यक्ष मुलायमसिंह यादव आले आणि त्यांनी आपल्याबरोबर सायकल चालविल्याचा दावा केला आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 23 Feb 2023
  • 11:38 am
स्वप्नात मुलायम अन् तेज प्रताप सायकलवर!

स्वप्नात मुलायम अन् तेज प्रताप सायकलवर!

#पाटणा

राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे बडे पुत्र आणि बिहारमध्ये मंत्री असलेले तेज प्रताप यादव कधी काय करतील किंवा कधी काय बोलतील याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही. पर्यावरणाबाबत सजग असलेल्या तेज प्रताप यांनी बुधवारी सायकलवरून सचिवालय गाठले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या स्वप्नात सायकल चिन्ह असलेल्या समाजवादी पक्षाचे दिवंगत अध्यक्ष मुलायमसिंह यादव आले आणि त्यांनी आपल्याबरोबर सायकल चालविल्याचा दावा केला आहे. उत्तर भारतात कधी काळी मुलायमसिंह यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजकारणाचा दबदबा होता. 

सचिवालयात सायकलवरून का आला असा प्रश्न केला असता तेज म्हणाले की, मी स्वप्नामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष दिवंगत मुलायमसिंह यादव यांना पाहिले. पर्यावरण संरक्षणासाठी मी त्यांच्याकडून सायकल चालविण्याची प्रेरणा घेतली. पहाटे पडलेल्या स्वप्नात मुलायम यांनी मला मिठी मारली आणि आशीर्वाद दिले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जीवनभर प्रवास करण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळेच तर सायकलने प्रवास करत मी अरण्यभवन या कार्यालयात पोहोचलो आहे. कार्यालयात पोहोचल्यावर ट्विट करत तेजप्रताप यांनी सायकल चालवा पर्यावरण वाचवा असा संदेश देत स्वप्नातील घटना सविस्तर सांगितली आहे. त्याबाबत ते म्हणतात की, वृदांवनला जाताना सैफई गावी मला नेताजी म्हणजे मुलायम भेटले. यानंतर त्यांनी स्वप्नातील साऱ्या घटना विस्ताराने सांगितल्या आहेत. अलीकडे तेजप्रताप आपल्या कामाबाबत फार गंभीर असल्याचे दिसत असून हल्ली त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे काम मनावर घेतले आहे.

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest