घर डिपॉझिटसाठी डावी किडनी विक्रीला
#बंगळुरू
येथील एका व्यक्तीने केलेली किडनी विक्रीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्याने आपली डावी किडनी विकायची असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. विजेच्या खांबावर ही जाहिरात लावली असून त्यात क्यू आर कोड दिला आहे. आता हे प्रसिद्धी तंत्र आहे की बंगळुरूमधील अवाजवी घर भाडी, डिपॉझिट रकमेकडे लक्ष वेधण्याचा मार्ग हे काही सध्या समझत नाही.
रामय्या असे त्याने आपले नाव दिले असून ट्विटरवरील जाहिरातीत तो म्हणतो की, घरमालकाला डिपॉझिट देण्यासाठी पैशाची गरज असून त्यामुळे किडनी विकून पैसे उभे करायचे आहेत. ट्विटरवर पहिल्या ओळीखाली असे म्हटले आहे की, तुम्हाला विनोद वाटेल, पण मला इंदिरानगरमध्ये घर भाड्याने घ्यावयाचे आहे. प्रोफाईलसाठी कोड स्कॅन करा. ॲड देणाऱ्याने आपला क्यू आर कोड स्कॅन केला आहे. बंगळुरू टेक्नो कॅपिटल म्हणून ओळखले जाते. तेथे देशातील, परदेशातील अनेकजण वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे तेथे घर भाड्याने घेणे आणि डिपॉझिट रक्कम देणे अनेकांच्या आवाक्यात राहिलेले नाही. ही ॲड व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. त्यात घरभाडे आणि डिपॉझिटवर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. अनिता राणे ही तरुणी म्हणते की, मी देखील नक्की असेच करेन आणि मार्केटिंग तंत्राचा वापर करून उद्दिष्ट साध्य करेन. काही नेमक्या प्रतिक्रियात कोण कोण काय म्हणते ते पाहू या.
१) अभितोष - घर शोधताना नकार दिल्यावर घरमालक नाराज झाला. त्या वेळी मी म्हणालो होतो की, तुम्हाला माझ्यामुळे श्रीमंती लाभावी असे वाटत नाही. एक वेळ मी होंडा सिटी विकत घेईन आणि दूरच्या प्रवासासाठी ईएमआय भरत राहीन.
२)रॉकेट हेल्थ - मला अशी शंका आहे की घराच्या डिपॉझिटसाठी किडनीदेखील कमी पडेल.
३)प्रभांशू राजपूत - मानवी अवयवयांच्या तस्करीचा पुरस्कार, विजेच्या खांबावर विनापरवानगी जाहिरात लावणे किंवा गरीब असणे, यातील नेमका कोणता उद्देश ही जाहिरात देण्यामागे असावा. अशी जाहिरात देणाऱ्याला कसे पकडायचे यावर सरकारी अधिकारी आपले डोके लढवत असतील.
४) पराग जोशी - जाहिरातीत डावी नव्हे तर उजवी किडनी विकायची आहे, असा उल्लेख असायला हवा होता. भारतात आजकाल डाव्यांना कोणी विचारत नाही.
वृत्तसंंस्था