मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला नवी शक्ती आणि दृष्टी दिली होती. त्यांच्याच या पवित्र धरतीवर 21 व्या शतकातील नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत. नौदलाचा गौरवशाली इतिहास आहे. या तीन युद्धनौका भारतात बनवल्या गेल्या आहेत, ज्यामुळे सुरक्षेला नवे बळ मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. मोदींच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते.
भारताचा समुद्री वारसा, नौदलाचा गौरवशीला इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाला नवीन सामर्थ्य, दूरदृष्टी दिलेली आहे. आज त्यांच्या या पावन भूमीवर 21 व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठ पाऊल उचलत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
The commissioning of three frontline naval combatants underscores India's unwavering commitment to building a robust and self-reliant defence sector. Watch LIVE from Mumbai. https://t.co/d1fy14qcrT
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
हे पहिल्यांदा होतय, जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन तिघांना एकत्र कमिशन केल जातय. सर्वात गर्वाची बाब म्हणजे हे तिन्ही फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म मेड इन इंडिया आहेत. मी भारतीय नौदलाला, निर्माणकार्याशी संबंधित सर्वांना, इंजिनिअर्सना, श्रमिकांना आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. नौदल सुरक्षा जहाज इंडस्ट्रीमध्ये आपला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरीटाइम पावर बनत आहे. आज जे प्लॅटफॉर्म लॉन्च झालेत, त्यात याची झलक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आपला निलगिरी चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्यासाठी समर्पित आहे. सूरत वॉरशीप एका कालखंडाची आठवण करून देतो. जेव्हा भारत आशियाशी जोडलेला होता. त्याची आठवण देते. काही वर्षापूर्वी मला पहिल्या सबमरीनमध्ये सामील होण्याची संधी मिळाली होती. आता मला या क्लासच्या सहाव्या सबमरीनला कमिशन करण्याची संधी मिळाली आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म भारताची सुरक्षा आणि प्रगतीसाठी सामर्थ्य देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत ग्लोबल साऊथमध्ये जबाबदार सहकारी म्हणून ओळखला जातो. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादच्या भावनेतून काम करत आहे. नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सागरचा अर्थ सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिजन. आपण सागरच्या व्हिजनने पुढे गेलो. जेव्हा आपण जी २०चं यजमानपद स्वीकारलं. तेव्हा वन अर्थ, वन फ्युचर वन फॅमिलीचा मंत्र आपण दिला. कोरोनाच्या काळात आपण वन अर्थ वन हेल्थ हा मंत्र दिला. आपण संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानतो. आपण सबका साथ सबका विकासचा सिद्धांत पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे या क्षेत्राचं संरक्षण करणं भारत आपलं दायित्व समजतो असं मोदी म्हणाले.