आरती सुरू असताना अमित शाह यांनी जय शाह यांना झापले
Amit Shah scolding Jay Shah during temple aarti Viral Video : गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चिरंजीव जय शाह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अमित शाह हे जय शाह यांना ओरडत असल्याचं दिसत आहे. सगळीकडे या व्हिडिओची चर्चा सुरू असून या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ अहमदाबाद येथील असल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिरात आरती सुरू असताना अमित शाह यांनी चिरंजीव जय शाह यांना झापले. अमित शाह तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
🚨 #WATCH | Jay Shah tried to shield his baby from 'Aarti flames'.
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) January 15, 2025
Amit Shah: "Kashu nai thai, taro kai navi navai no chhokaro che"
– (Kuch nahi hoga bache ko, koi naya navela bacha nahi hai) 😅
Typical Indian father-son relationship 🥰 pic.twitter.com/D0NN4BwS7v
या व्हिडिओमध्ये अमित शाह हे आरती करत आहेत. आरतीचं ताट घेऊन ते जय शाह यांच्या हातात असलेल्या लहान बाळाजवळ जाताना दिसत आहेत. त्यांनी आरतीच्या दिव्यांवर हात फिरवून त्याची ऊब नातवाच्या चेहऱ्याला दिली. पण जय शाह हे बाळाला आगीपासून दूर नेले. तेव्हाच अमित शाह यांनी जय शाह झापले.'कस्सू नयी थे, तारे कै नोवो नको छोकरो छे' (काही होणार नाही; तुझा मुलगा काय नवीन आहे का?) असे अमित शाह म्हणाले.
दुसरीकडे बाप-लेकामधील ही कुरबूर पाहून नेटिझन्स मजा घेताना दिसत आहेत. काहींनी 'टिपिकल भारतीय बाप-लेक' अशा कमेंट्स देखील केल्या आहेत.