भारतीयांना खेळांमध्ये सर्वाधिक रस! गुगलच्या २०२४ मधील ‘टॉप टेन’पैकी पाच सर्च क्रीडा क्षेत्राशी संबंधित

नवी दिल्ली : भारतीयांचा क्रीडा प्रकारांमधील रस अलीकडील काळात वाढीस लागला आहे. यंदा भारतीय नागरिकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या ‘टॉप टेन’ की वर्ड सर्चपैकी पाच विषय खेळांशी संबंधित आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारतीयांचा क्रीडा प्रकारांमधील रस अलीकडील काळात वाढीस लागला आहे. यंदा भारतीय नागरिकांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या ‘टॉप टेन’ की वर्ड सर्चपैकी पाच विषय खेळांशी संबंधित आहेत.

सध्या इंटरनेटवर सगळीकडे ‘२०२४ गुगल सर्च लिस्ट’ची चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगट यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेलेली भारतीय ठरली. आता अशा दहा कीवर्डची लिस्ट समोर आली आहे, ज्यांना भारतीयांनी या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केले. या लिस्टमध्ये भारतीय जनता पक्ष अर्थातच भाजप, लोकसभा निवडणूक निकाल आणि पॅरिस ऑलिम्पिक यांचा समावेश आहे. मात्र पहिलं दोन स्थान खेळाशी संबंधित विषयांनी पटकावलं आहे.

या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर इंडियन प्रीमयर लीग अर्थातच आयपीएल आहे. शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं यावर्षी आयपीएल २०२४चं विजेतेपद पटकावलं. नुकत्याच झालेल्या मेगा लिलावादरम्यान आयपीएल पुन्हा एकदा चर्चेत आलं होतं. मेगा लिलावात रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना अनुक्रमे २७ कोटी आणि २६.७५ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी करण्यात आलं.दुसऱ्या क्रमांकावर २०२४ मधील टी२० विश्वचषक आहे. भारतानं यावर्षी झालेल्या टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं होतं.

भारतीयांनी यावर्षी खेळांमध्ये खूपच रुची दाखवली. ‘टॉप टेन’ लिस्टमध्ये पाच विषय खेळांशी संबंधित आहेत. पहिल्या क्रमांकावर आयपीएल, दुसऱ्या क्रमांकावर टी२० विश्वचषक, पाचव्या क्रमांकावर पॅरिस ऑलिम्पिक, नवव्या क्रमांकावर प्रो कबड्डी लीग आणि दहाव्या क्रमांकावर इंडियन सुपर लीग (फुटबॉल) आहे.

२०२४ मधील गुगलची भारतातील टॉप-टेन की वर्ड सर्च लिस्ट

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)

टी-२० विश्वचषक

भारतीय जनता पार्टी

लोकसभा निवडणूक निकाल

ऑलिम्पिक

भीषण गर्मी

रतन टाटा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

प्रो कबड्डी लीग

इंडियन सुपर लीग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest