केंद्र सरकारच्या कृषी निर्यात क्षेत्रात सोलापूरच्या केळीचा समावेश करा; धैर्यशील मोहिते-पाटील यांची पीयूष गोयल यांच्याकडे मागणी

सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकाच्या निर्यातीस केंद्र सरकारने चालना द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील‌ यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे.जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून सुमारे १९ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आले आहे.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील‌ आणि पीयूष गोयल

सोलापूर : जिल्ह्यातील केळी पिकाच्या निर्यातीस केंद्र सरकारने चालना द्यावी, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील‌ यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे.जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून सुमारे १९ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आले आहे. महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातीपैकी सुमारे ५८ टक्के निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून सुमारे ११ लाख २३ हजार ५२४ हजार मेट्रिक टन केळी निर्यात झाली. यातील सुमारे ६ लाख ४८ हजार २६२ मेट्रिक टन केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली आहे.

एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यातून सुमारे २५ हजार कंटेनर केळीची निर्यात झाली. त्यातील १६ हजार कंटेनर केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली आहे. केंद्र सरकारने निर्यातीस चालना देण्यासाठी राबवलेल्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात समावेश झाला पाहिजे, यासाठी खासदार धैर्यशील यांनी मंगळवारी मंत्री गोयल यांची भेट घेऊन चर्चा केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest