घरगुती गॅस फक्त ११०३ रुपयांना

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून यावेळी व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आता स्वयंपाकघरातील गॅसचा वापर करताना विचार करावा लागणार आहे. याखेरीज व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीचा अप्रत्यक्ष फटकाही सर्वसामांना बसणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 05:58 pm
PuneMirror

घरगुती गॅस फक्त ११०३ रुपयांना

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ; हॉटेलमधील जेवण ठरणार चैन

#नवे दिल्ली

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून यावेळी व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आता स्वयंपाकघरातील गॅसचा वापर करताना विचार करावा लागणार आहे. याखेरीज व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीचा अप्रत्यक्ष फटकाही सर्वसामांना बसणार आहे.  

१ मार्च २०२३ पासून देशभरामध्ये काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार एलपीजी सिलेंडरच्या दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. सरकारद्वारे घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांचे मासिक आर्थिक नियोजन बिघडणार आहे. आजपासून एलपीजी सिलेंडर्ससह अन्य अनेक गोष्टींच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये ५० रुपयांनी वाढ करण्यात आले आहेत. यानुसार दिल्लीमध्ये १४.२ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत ११०३ रुपये झाली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये ३५०.५० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या गॅस सिलेंडरची किंमत २,११९.५० रुपये झाली आहे.

२०२२ मध्ये काही महिन्यांपूर्वी घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या दरात १५० रुपयांनी वाढ केली गेली होती. तेव्हा व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडरची किंमत २५ रुपयांनी वाढवण्यात आली होती. ६ जुलै २०२२ पासून एलपीजी सिलेंडर्सच्या दरामध्ये बदल करण्यात आला नव्हता. होळीपूर्वी या दरांमध्ये वाढ होण्याची शंका व्यक्त केली जात होती. स्थानिक करांवरुन घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमती अवंलबून असतात. राज्यानुसार त्यांच्या किंमतींमध्ये बदल पाहायला मिळतात. तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या दरांबाबत माहिती प्रसिद्ध करत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतींचा परिणाम देशांतर्गत गॅस सिलेंडर्सच्या किंमतींवर होत असतो. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest