संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेल्या दिल्लीतल्या बंगल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सुनेत्रा पवार यांना जनपथ मार्गावरील ११ क्रमांकाचा बंगला देण्यात आला आहे. हा बंगला शरद पवार यांच्या बंगल्यासमोरच आहे. याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांची देखील निवासस्थाने आहेत. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांचा बंगला हा शरद पवार यांच्या बंगल्यापेक्षा 'भारी' असल्याचे बोलले जात आहे.
सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच खासदार बनल्या आहेत. तरीही त्यांना ल्युटेन्स दिल्ली मधील 'टाइप ७' (Type-VIII) या प्रकारातील बंगला देण्यात आला आहे. याचा अर्थ या बंगल्याचे वाटप सभागृहाच्या गृह समितीने केले असा होतो. तर '६ जनपथ' हा शरद पवार यांचा बंगला 'टाइप ८' दर्जाचा आहे. याच बंगल्यात त्यांच्या मुलगी खासदार सुप्रिया सुळे या देखील राहतात. मात्र पवार यांचा बंगला सामान्य श्रेणीच्या अंतर्गत येतो. त्याचे व्यवस्थापन आणि वाटप गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे केले जाते. खरं तर पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचलेल्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांना देण्यात आलेल्या श्रेणीचा बंगला दिला जात नाही. पण तरीही त्यांना तो देण्यात आल्याचे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये लढत झाली होती. मात्र सुनेत्रा पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देवून आपण चूक केली असे अजित पवार म्हणाले होते. मात्र लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांना लगेचच राज्यसभेची खासदारकी दिली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी ४१ जागा जिंकत शरद पवारांवर कुरघोडी केली. दिल्लीत त्यांचे वजन वाढले असल्याची चर्चा आहे. यामुळेच सुनेत्रा पवार यांना दिल्लीत मोठा बंगल्याचे वाटप करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.