आठवलेंच्या आरपीआयचे नागालँडमध्ये दोघे विजयी

त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि सहकारी पक्ष सत्तेवर येणार हे निश्चित झाले असून मेघालयात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येण्याची चिन्हे असून तेथे कोनार्ड संगमा यांचा पक्ष आघाडीवर आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 3 Mar 2023
  • 07:20 am

आठवलेंच्या आरपीआयचे नागालँडमध्ये दोघे विजयी

आठवलेंच्या आरपीआयचे नागालँडमध्ये दोघे विजयी

#नवी दिल्ली

त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि सहकारी पक्ष सत्तेवर येणार हे निश्चित झाले असून मेघालयात त्रिशंकु विधानसभा अस्तित्वात येण्याची चिन्हे असून तेथे कोनार्ड संगमा यांचा पक्ष आघाडीवर आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत.   

नागालँडमध्ये भाजप आणि सहकारी पक्ष नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) ३८ मतदारसंघात आघाडीवर आहेत. गेल्या वेळेपेक्षा ८ अधिक मतदारसंघात त्यांनी आघाडी घेतली असून स्वातंत्र्यानंतर राज्याच्या विधानसभेत प्रथमच महिला आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे दोन सदस्य नागालँण्ड विधानसभेत निवडून आले आहेत. आठवले यांच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य विधानसभेत नसताना त्यांच्या पक्षाचे नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आल्याने त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. टूएनसंद सदर-२ मतदारसंघात इम्तिचोबा आणि नोकसेन मतदारसंघात वाय. लिया ओनेन चँग हे उमेदवार विजयी झाले. आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ऊस शेतकरी या निवडणूक चिन्हावर आठ उमेदवार उभे केले होते.  

त्रिपुरात विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान झाले होते. गुरुवारी सकाळी मतदान मोजणीस सुरुवात झाल्यापासून भाजप आणि इंडिजीनियस प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) ने ३४ मतदारसंघात आघाडी घेतली आहे. २०१८ च्या तुलनेत आघाडीच्या १० जागा कमी झाल्याचे दिसत असून २०१८ मध्ये भाजपने ३६ तर आयपीएफटीने ८ जागा जिंकल्या होत्या. सध्या भाजप २८ ठिकाणी आघाडीवर आहे. डाव्यांनी आणि त्यांच्या नव्या सहकारी पक्षाने म्हणजे काँग्रेसने १४ मतदारसंघात आघाडी घेतली आहे. माजी राजे प्रद्योत किशोर देबबर्मांच्या तिप्रा मोथा या पक्षाने पदार्पणात १२ जागांवर आघाडी घेतली आहे. 

मेघालयात कोनार्ड संगमाच्या नॅशनल पीपल्स पार्टीने २५ जागांवर आघाडी घेतली आहे. मेघालयात ६० जागांसाठी मतदान झाले असून गेल्या वेळी संगमा यांनी भाजपच्या बरोबरीने सत्तेत भागीदारी स्वीकारली होती. या वेळी संगमा स्वतंत्रपणे मैदानात उतरले आहेत. भाजप ३ मतदारसंघात आघाडीवर असून पुन्हा संगमाशी ते हातमिळवणी करू शकतात. संगमाच्या पक्षावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजपने आघाडी मोडली. मेघालयात प्रथच निवडणूक लढवणाऱ्या तृणमूल काँग्रेसने ५ तर काँग्रेसने ५ मतदारसंघात आघाडी घेतली आहे.     

पाच राज्यांतील पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने दोन जागा जिकल्या आहेत. महाराष्ट्रातील कसबामध्ये रवींद्र धंगेकर आणि पश्चिम बंगालमध्ये सागरदिघी मतदारसंघात बेरॉन बिश्वास यांनी विजय मिळवला.  वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest