'असिल' कोंबडीची 'असली' डिमांड
#नवी दिल्ली
कोंबडीचे अंडे सहा रुपयाला मिळते. तर चिकन फार तर फार २०० रुपयांपर्यंत मिळते. पण, एक कोंबडी अशी आहे जिचे मांस आणि अंडे इतके महाग आहे की सामान्य लोकांच्या खिशाला ते परवडत नाही. त्यामुळे ही कोंबडी भलतीच चर्चेत आली आहे.
आपल्या देशात असिल जातीची कोंबडी सध्या चर्चेत आहे. या कोंबडीचे मांस आणि अंडी यातून मिळणारा फायदा लक्षात घेता त्यांना पाळणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. या कोंबड्या अंडी उत्पादनाच्या दृष्टीने कमकुवत मानल्या जातात. कारण, त्या वर्षाला केवळ ६० ते ७० अंडी घालतात. त्याच्या अंड्यांची किंमत बरीच जास्त आहे. या कोंबडीचे अंडे डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
प्रोटिन आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने कोंबडी आणि अंड्यांना जास्त डिमांड आहे. पण, असील कोंबडीचे एक अंडे १०० रुपयांना विकले जाते. असिल कोंबडीची मान लांब व बेलनाकार असून त्याला पंख, दाट डोळे, लांब मान असते. त्यांचे पाय मजबूत आणि सरळ असतात. या जातीच्या कोंबडीचे वजन ४-५ किलो तर कोंबड्याचे वजन ३-४ किलो असते. त्याच्यातील तरुण कोंबडीचे सरासरी वजन ३.५-४.५ किलो आणि कोवळ्या कोंबडीचे सरासरी वजन २.५-३.५ किलो असते.वृत्तसंंस्था