महिलांची स्वबळावर ९० हवाई उड्डाणे
#नवी दिल्ली
महिला दिनानिमित्त जगभर महिलांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांच्यातील वेगळे गुण जगासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यातून महिलांच्यात दडलेल्या गुणांची, कर्तृत्वाची आपणाला ओळख होत असते. महिला दिनानिमित्त एअर इंडियाने आपल्या एअर इंडिया एक्सप्रेस, एअर आशिया इंडिया या सहकारी कंपन्यांच्या सहकार्याने १ मार्चपासून ९० उड्डाणे केवळ महिला कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने पार पाडली. भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या पहिल्या व्यावसायिक प्रवासाला ९० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने ९० हवाई उड्डाणे महिला कर्मचाऱ्यांसमवेत पार पाडली गेली.
वरील ९० हवाई उड्डाणातील देशांत आणि परदेशात ४० हवाई उड्डाणे पार पाडली ती सर्व महिला कर्मचाऱ्यांसमवेत. एअर इंडिया एक्स्प्रेसने १० आंतरराष्ट्रीय उड्डाणे पार पाडली. यातील बहुतेक उड्डाणे आखाती देशातील होती. एअर आशिया इंडियाने ४० उड्डाणे हाती घेतली. ही उड्डाणे मात्र पूर्ण भारतातील होती. एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ अलोकसिंग याबाबत म्हणाले की, कामाच्या ठिकाणी प्रामुख्याने नेतृत्वाच्या बाबतीत समानता असावी यावर आमचा कायमच भर असतो. हवाई उड्डाण ही एकेकाली पुरुषांची मक्तेदारी मानली जात असे. आजही अनेक ठिकाणी यामध्ये पार फरक पडलेला नाही. मात्र, मोक्याच्या ठिकाणी आमच्याकडे ही जबाबदारी महिला सहकारी पार पाडतात ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या समुहातील मनुष्यबळामध्ये ४० टक्के महिला आहेत आणि विमानातील कॉकपीटमधील त्यांची भागीदारी ही जवळ जवळ १० टक्के एवढी लक्षणीय आहे. एअर इंडियाकडे सर्वाधिक म्हणजे २०० हून अधिक महिला वैमानिक आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस, एअर आशिया इंडिया या सहकारी कंपन्यामध्ये ९७ महिला वैमानिक आहेत. आजकाल महिला मोठ्या संख्येने वैमानिक होण्याचे ध्येय बाळगून असतात. आमच्याकडे जगातील सर्वाधिक महिला वैमानिकांची संख्या असल्याने आम्ही कामांच्या बाबतीत समानतेचे तत्व अवलंबू शकतो. आम्ही समानतेचे आणि वैविधतेचे हे तत्व भविष्यातही राबवणार असून महिला सहकाऱ्यांना समान व्यावसायिक संधी कशी मिळेल याला प्राधान्य देऊ.देशातील हवाई प्रवास अधिक आकर्षक व्हावा यासाठी अधिकाधिक महिलांनी या क्षेत्रात सहभागी व्हावे यासाठी आमचे प्रयत्न असतील.
नवी दिल्ली-सन फ्रान्सिसिको आणि ध्रुवीय हवाई मार्गावर संपूर्ण महिला कर्मचाऱ्यांनी उड्डाण करण्याच्या कामगिरीचा मान एअर इंडियाच्या नावावर आहे. वृत्तसंंस्था