कतरिनाची गळाभेट!
बॉलिवूड (Bollywood) किंवा मनोरंजन विश्वात कतरिना कैफ (Katrina Kaif)पूर्वीइतकी व्यस्त नाही. विकी कौशलबरोबर विवाह झाल्यानंतर तिने कामाचा व्याप थोडा कमी केलेला दिसतो आहे. केरळच्या कल्याणरामन कुटुंबाने नवरात्रीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमास तिने हजेरी लावली, त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दक्षिणेचा सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) कतरिनाचे स्वागत करताना दिसत आहे.
व्हीडीओत कतरिना लाल फुलांच्या साडीत दिसत आहे. पूर्ण बाह्यांचा ब्लाउज आणि कपाळावर बिंदी लावलेल्या कतरिनाचा सौंदर्य उठून दिसत आहे. तिचे स्वागत करणाऱ्या नागार्जुनने पांढर्या रंगाचा फ्लोरल प्रिंट कुर्ता-पायजमा घातलेला आहे. व्हीडीओमध्ये कतरिना नागार्जुनसोबत नम्रपणे गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी गप्पा मारताना नागार्जुनने कतरिनाचा हात धरला आहे. निघण्यापूर्वी दोघांनी एकमेकांची खूप आपुलकीने गळाभेट घेतली. सोशल मीडियावर चाहत्यांची या व्हीडीओला खूप पसंती मिळत आहे. या कार्यक्रमात वामिका गब्बी देखील सहभागी झाली होती. वामिका गुलाबी रंगाच्या साडीत होती. या गुलाबी साडीत तिचे सौंदर्य उठून दिसत होते.
कार्यक्रमाला कतरिना कैफव्यतिरिक्त शिल्पा शेट्टी, अजय देवगण, जान्हवी कपूर, क्रिती सेनन, सोनाक्षी सिन्हा, कार्तिक आर्यनपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे म्हटले तर ती लवकरच सलमान खानसोबत टायगर ३ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टायगर ३ चे पहिले गाणे ‘लेके प्रभू का नाम’ नुकतेच प्रेक्षकासाठी उपलब्ध झाले आहे. त्याने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात सलमान आणि कतरिना कैफशिवाय इम्रान हाश्मीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.