Walmik Karad: पुन्हा वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडीत रवानगी; न्यायालयाने सुनावली 14 दिवसाची कोठडी

आवादा कंपनीच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून कराडचे नावं सातत्याने समोर येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 14 Jan 2025
  • 02:26 pm
antosh Deshmukh Case, Walmik Karad, Dhananjay Deshmukh, Santosh Deshmukh, Beed Crime, Beed Police, devendra fadnavis, Dhananjay Munde, parli, parli police station, marathi news, maharashtra news, latest marathi news

संग्रहित

खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आवादा कंपनीच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून कराडचे नावं सातत्याने समोर येत आहे.

खंडणी प्रकरणाबाबात वाल्मिक कराड यांना आज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत कराडला पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच कराडवर मकोका लावला आहे. 

न्यायालयात नेमकं घडलं काय?

एका वृत्तसंस्थेनुसार, न्यायालयात सुनावणीदरम्यान तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. तसेच, कराडची संपत्ती भारतात अथवा भारताबाहेर आहे का?, याचा तपास करायचा असल्याचे यावेळी गुजर म्हणाले. 

 

5 दिवसात काय तपास केला, वाल्मिक कराडने सहकार्य केलं नाही यांचं उदाहरण सांगा? असा सवाल उपस्थित करत वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेनी न्यायालयात युक्तिवाद केला. 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी कऱण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी १० दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली?, हा सगळा तपास 15 दिवसांपुर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला?, असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला. तसेच  वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा...आता पोलीस कोठडीची गरज नाही, असंही कराडचे वकिल म्हणाले.

Share this story

Latest