संग्रहित
खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असणारा आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपली असून त्याला आज केज सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड याने 31 डिसेंबरला पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला केजमध्ये आणण्यात आले होते. याठिकाणी सत्र न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. वाल्मिक कराडची 14 दिवसाची पोलीस कोठडी आज संपत आहे. दरम्यानस त्याला आज दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेले चौदा दिवस झाले कराड याला बीड येथील शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.
न्यायालयात हजर करण्यापूर्वी वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. काल सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले होते. आजच्या सुनावणीदरम्यान, अॅडव्होकेट सिद्धिश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराडची बाजू मांडतील.
View this post on Instagram
वाल्मिक कराड याच्यावर 302 चा गुन्हा आणि मोक्का लावण्याची मागणी
देशमुख हत्याप्रकरणी कराड याच्यावर 302 आणि मोक्का लावण्याची मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात येत आहे. अशातच आज, कराडच्या आईकडून परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. संतोष देशमुख प्रकरणात जातीय द्वेषातून राजकीय दबावापोटी कार्यवाही न करता निष्पक्षपणे चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा देत वाल्मिक कराडच्या समर्थकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू होणार होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जमावबंदीचे आदेश 14 जानेवारीपासून ते 28 जानेवारीपर्यंत लागू असतील.