ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई : महिला आयोग, एससी, एसटी आयोग, मानव अधिकार आयोग यांचा जो अहवाल येईल, त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आय. जी आणि एस.पी यांनी त्यांना खरी माहिती दिली का ? याचा त्यांनी तपास करावा आणि योग्य कारवाई करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये तथ्य आहे. ते माझ्या संपर्कात होते. त्यांना विनंती केली की, 14 - 15 वर्षांच्या मुली पकडण्यात आल्या त्यांना सोडण्यात यावं, पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार तत्काळ थांबवावा आणि कोंबिंग ऑपरेशन ताबडतोब थांबवावं. देवेंद्र फडणवीस आणि आय.जी यांच्याशी माझा कॉन्फरन्स कॉल झाला. आय.जी ने यामध्ये लक्ष घालतो असे म्हटले. आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की, आय.जी आणि एस.पी यांनी सांगितले की, कॉम्बिंग ऑपरेशन झाले नाही. कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरे तोडण्यात आली आहेत, घरात घुसून मारण्यात आले आहे. एका सव्वा महिन्याच्या बाळंतीण महिलेला सुद्धा मारण्यात आलेले आहे. अशा सर्व घटनांनची चौकशी ही आय. जी आणि एस.पी नाही, तर इतर कमिटी मार्फत करावी आणि पीडितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही ॲड. आंबेडकर यांनी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.