संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) वरिष्ठ अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारच्या देशमुख कुटुंबावर हल्ला केला. कल्याणमधील योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा हाईट्स या इमारतीत हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शुक्ला देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत असताना दिसत आहे. या घटनेनंतर शुक्ला यांना निलंबित करण्यात आले होते. देशमुख कुटुंबावर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता या प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. शुक्ला यांना अटक झाल्याची माहिती समजत आहे.
कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी वर्षा कालविकट्टे यांच्यात धूप लावण्यावरून वाद झाले. या प्रकरणातून वाद विकोपाला गेले. देशमुख कुटुंबातील दोन भावांवर शुक्ला याने माणसे बोलावून लोखंडी रॉडने वार करत त्यांना जखमी केले. तसेच शुक्ला याच्या पत्नीने मराठी लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली, असे आरोप लावण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे जनक्षोभ उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्ला याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते कितीही मोठे अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल असे आश्वासन सभागृहात दिले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.