पुण्यात चाललंय काय? सिंहगड रोडवर तरुणावर कोयत्याने हल्ला
पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आज सकाळी कोयत्याने एका तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर आला आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यतून झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात सागर चव्हाण हा तरुण जखमी झाला आहे.
View this post on Instagram
मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून भांडण झाले होते. त्यावेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू देखील झाला होता. श्रीनिवास वतसलवार असे या तरुणाचे नाव होते. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण एक होता.
आज पुण्यातील किरकटवाडी भागात सागर चव्हाण याला एका मित्राने बोलवून घेतले असताना त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.