पुणे विद्यापीठात चोरी, गुन्हा दाखल
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (Savitribai Phule University) ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागामधील सर्वर रूममधून दहा हजार रुपयांच्या केबलचे बंडल लंपास करण्यात (Pune Crime News) आले. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस (Chatushringi Police) ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान घडला.
महेश जयसिंग गायकवाड (Mahesh Jaising Gaikwad) (वय ३०, रा. गारमळा, सिंहगड रोड, धायरी ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संदेश रोहिदास जाडकर (वय ५६, रा. सहदेव हाईट्स, सोमेश्वर वाडी रोड, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. जाडकर हे पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा अभ्यास प्रणाली विभागामध्ये संचालक म्हणून काम करतात.
या ठिकाणी सर्वर रूम आहे. विद्यापीठात सीसीटीव्ही इन्स्टॉलेशनसे काम सुरू होते. हे काम करणारा आरोपी गायकवाड याने सर्वर रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडले. आतमध्ये ठेवलेले दहा हजार रुपयांचे केबल त्याने चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.