Pune Crime News : येनपूरे टोळीच्या म्होरक्या पप्पू येनपूरे पोलिसांच्या जाळ्यात, बारामतीमधून केलं जेरबंद

पुणे: येनपूरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपूरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामतीमधून अटक केली आहे. येनपूरे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 15 Jan 2025
  • 05:21 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: येनपूरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपूरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामतीमधून अटक केली आहे. येनपूरे टोळीविरुद्ध  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये  (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. कारवाई नंतरही येनपूरे दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देत पसार होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. कात्रज, आंबेगाव भागात या टोळीने मोठ्या प्रमाणात दहशत माजवली होती. 

भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपूरे  (वय ३०, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) याला अटक केली आहे. येनपूरे याच्यासह साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

दोन वर्षांपूर्वी  येनपूरे याच्यावर पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. तेव्हापासून तो पसार झाला होता. पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र येनपूरे हा मोबाइल वापरत नसे. तसेच त्याच्या राहण्याचे ठिकाण देखील तो सतत बदलत असायचा. त्यामुळे त्याच्याविषयी जास्त माहिती मिळत नव्हती. मात्र भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारावकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी हे त्याच्या मागावर होते. 

पोलीस येनपूरे याचा शोध घेत असताना तो बारामतीतील नीरा वागस परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. 

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन चोरमोले, सागर बोरगे, चेतन गोरे यांनी ही कारवाई केली.

Share this story

Latest