Atal Setu Bridge Suicide : धक्कादायक! पुण्याच्या तरुण बँकरने अटल सेतूवरून पाण्यात उडी मारून केली आत्महत्या
पुणे : पुण्याच्या ३५ वर्षीय बॅंकरने अटल सेतूवरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातून मंबईला गेलेल्या या बॅंकरने परत येताना आयुष्याचा शेवट केला आहे. कामाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. (Atal Setu Bridge Suicide)
ॲलेक्स रेगी (वय.३५,रा.पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या बॅंकरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील ॲलेक्स रेगी हा कोटक महिंद्रा बँकेत नोकरीला होता. कंपनीच्या मिटींसाठी तो मुंबईला गेला होता. बीकेसीला बँकेच्या बैठकीला त्याने हजेरी लावली होती. त्यानंतर त्याने मुंबईत राहणाऱ्या सासऱ्याचीही त्याने भेट घेतली होती. तेथून पुण्याला परत येत असताना त्याने अटल सेतूवरून उडी मारली आणि आयुष्याचा शेवट केला. एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे समजताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत रेगी याचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीमध्ये कार थांबल्याचे पाहून यंत्रणेने पोलिसांना याची सूचना दिली होती. परंतू, पोलीस पोहोचेपर्यंत अॅलेक्सने समुद्रात उडी मारली होती.
दरम्यान रेगी याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समोर आले आहे. कामाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीद्वारे समोर आले आहे. बचाव पथकाने त्याचा मृतदेह शोधला आणि कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. वरिष्ठांनी त्याच्यावर कामचा दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असून यासंदर्भात कसून चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.