संग्रहित छायाचित्र
पुणे : माथेफिरू तरुणाने त्याच्या आई आणि आजोबाला मारहाण करीत धारदार हत्यार हवेमध्ये नाचवीत आजोबाला मारून टाकण्याची धमकी (threat) दिली. तसेच कॉलनीमध्ये दहशत माजवली. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शेवाळेवाडी येथील शिवचैतन्य कॉलनी मध्ये घडली. (Pune Crime News)
गौरव संतोष अडसूळ (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भास्कर तुकाराम अडसूळ (वय ६३) यांनी फिर्याद दिली आहे. गौरव हा फिर्यादी भास्कर यांचा नातू आहे. तो त्याच्या आईला मारहाण करीत होता. त्यावेळी आजोबा भास्कर हे भांडणे सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी गौरव याने घरातील जेवणाचा स्टीलचा डबा भास्कर यांच्या डोक्यात मारला आणि त्यांना दुखापत केली. घराबाहेर येऊन त्याने कंबरेला लावलेले लोखंडी धारदार हत्यार बाहेर काढले आणि हवेमध्ये फिरवून 'आता या म्हाताऱ्याला कायमचा संपवतो' अशी धमकी दिली. 'मी कॉलनीचा भाई आहे. आमच्यात कोणी येऊ नका' असे म्हणत दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.