दारूसाठी सोनसाखळी दिली नाही... पत्नीच्या नाकाचे मोडले हाड
पुणे : दारूच्या व्यसनापायी पत्नीच्या नाकावर बुक्की मारून नाकाचे हाड फ्रॅक्चर करीत खांद्यावर थेट व्यायामाचे डंबेल्स मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police)पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही सर्व घटना केशवनगर मुंढवा या ठिकाणी घडली. (Pune Crime News)
नेल्सन सॅम्युअल आसापुरे (वय ५०) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रूपाली बाळकृष्ण शिंदे (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. नेल्सन आणि रूपाली पती-पत्नी आहेत. आरोपी नेल्सन याला दारू पिण्याचे व्यसन आहे. घरातील वस्तू विकून तो दारू पितो. घटनेच्या दिवशी आरोपी हा दारू पिऊन आला. त्यावेळी त्याने रूपाली यांच्याकडे तिच्या गळ्यातील सोन्याची चैन मागितली. या महिलेने ही सोनसाखळी देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला शिवीगाळ करीत नाकावर जोरात बुक्की मारली. यामध्ये तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यानंतर आरोपीने व्यायामाचे डंबेल्स तिच्या खांद्यावर आणि पाठीवर मारून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.