पुणे: ‘वाघोली’ येथील स्कूलमध्ये शिपायाकडून मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पुणे: ‘वाघोली’ येथील स्कूलमध्ये या शाळेत चौथीमध्ये शिकणाऱ्या एका दहा वर्षीय मुलावर शाळेच्या शिपायाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून या मुलाला शाळेच्या स्वच्छतागृहात एकटे गाठून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संग्रहित छायाचित्र

मुलाने कुटुंबियांकडे वाच्यता केल्यानंतर उघडकीस आला प्रकार

पुणे : वाघोली येथील शाळेत चौथीमध्ये शिकणाऱ्या एका दहा वर्षीय मुलावर शाळेच्या शिपायाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून या मुलाला शाळेच्या स्वच्छतागृहात एकटे गाठून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर हा मुलगा पळून वर्गात जाऊन बसल्यावर त्याला तिथे जाऊन आरोपीने पोर्नहब डॉट कॉम नावाचे संकेतस्थळ उघडून अश्लील व्हिडीओ दाखवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलाने घरी आईकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

विमल राव (रा. वाघोली) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलाच्या ३५ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वाघोलीतील स्कूल मध्ये शिपाई म्हणून काम करतो. तर, पिडीत मुलगा शाळेमध्ये चौथीमध्ये शिकण्यास आहे. फिर्यादीनुसार, १९ एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास फिर्यादी यांनी मुलाला शाळेमध्ये सोडले. त्यानंतर, हा मुलगा स्वच्छतागृहात गेला होता. आरोपीने या मुलाला तिथे एकटे गाठले. त्याला त्याचे नाव विचारले. त्याला सिनेमा बघतो का अशी विचारणा केली. त्यावर मुलाने त्याला नाही असे सांगितले. त्यावेळी आरोपीने पिडीत मुलाला शाळेतले सर्व कॅमेरे बंद आहेत. तु काही काळजी करू नको. कोणाला काही समजणार नाही.’ असे म्हणत त्याच्याशी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. 

 

त्यावेळी मुलाने स्वत:चा बचाव करीत तेथून पळ काढला. हा मुलगा घाबरत घाबरतच वर्गात येऊन बसला. त्यावेळी आरोपी त्याच्या वर्गात आला. त्याने मुलाच्याजवळ जाऊन ‘तुला टॉयलेटमध्ये यायचे नाही तर ठीक आहे. तुला इथेच फिल्म दाखवतो.’ असे म्हणत त्याच्या खिशातील मोबाईल काढला. या फोनवर अश्लील  व्हिडिओचे संकेतस्थळ उघडण्यात आले. त्यावेळी या मुलाने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. तेव्हा, आरोपीने त्याच्या खुर्चीला जोरजोरात हलवून धमकावण्यास सुरुवात केली. तसेच, याबाबत कोणाला काही सांगितले तर मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने शाळा सुटल्यानंतर घरी जाऊन आईला याबाबत सर्व माहिती दिली. पिडीत मुलासह त्याच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास करे यांनी सांगितले, की आरोपीचे नाव समजले असून त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा गंभीर प्रकार असून आम्ही संवेदनशीलपणे तपास करीत आहोत.  

 

दरम्यान, शाळेमधील सीसीटीव्ही खरोखरीच बंद आहेत का याचा पोलीस तपास करीत आहेत. तसेच, शाळेतील मुख्याध्यापक आणि अन्य शिक्षकांकडे देखील चौकशी केली जाणार आहे. एवढ्या महागड्या आणि उच्चभ्रू शाळेत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरोपीवर कडक कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest