संग्रहित छायाचित्र
शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष असल्याचे सांगण्यात आले. ही मुलगी १३ वर्षांची आहे. ती गुरुवारी सकाळी मैत्रिणीसह सव्वासातच्या सुमारास शाळेत जात होती. आरोपीने या मुलींचा पाठलाग केला. त्यांची अडवणूक करीत त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. घाबरलेल्या मुलींनी बचावासाठी आरडाओरडा सुरू करताच आरोपी पसार झाला. भेदरलेल्या मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.