संग्रहित छायाचित्र
बेकायदेशिररित्या विक्री बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथक १ ने सापळा रचून अटक केली.
सोलापूर रस्त्यावर लोणी टोलनाक्यावरील रेड्डी हॉटेल शेजारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा १४ किलोचा गांजा आणि इतर दस्तऐवज जप्त केला.
विनायक जगताप वय (वय २८, रा. हनुमाननगर, साईबाबा मंदिराजवळ, केळेवाडी, कोथरूड) असे ताब्यात घेतलेले आरोपीचे नाव आहे. पोलिसांना तो गांजा अमली पदार्थ व इतर ऐवज बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना दिसून आला. त्याच्या ताब्यातील सॅकबॅगचे झडतीमध्ये ३ लाख १३ हजार ८४० रुपयांचा १४ किलो गांजा मिळून आला. या प्रकरणी त्यांच्या विरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एकूण ३ लाख १३ हजार ८४० रुपये किमतीचा गांजा व इतर ऐवज हस्तगत करून अटक केली.
अमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे व पोलीस अंमलदार लोणीकाळभोर स्टेशनच्या हद्दीत पेट्रेलिंग करताना अमली पदार्थ विरोधी पथक-१ ला बातमीदारामार्फेत माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.