तीन लाखांचा गांजा जप्त, एकाला केली अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे : बेकायदेशिररित्या विक्री बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने सापळा रचून अटक केले. सोलापुर रस्तावर लोणी टोलनाक्यावरी रेड्डी हॉटेल शेजारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा १४ किलोचा गांजा आणि इतर दस्तऐवज जप्त केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 13 Dec 2024
  • 04:51 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : बेकायदेशिररित्या विक्री बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने सापळा रचून अटक केले. सोलापुर रस्तावर लोणी टोलनाक्यावरी रेड्डी हॉटेल शेजारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचा १४  किलोचा गांजा आणि इतर दस्तऐवज जप्त केला. 

विनायक जगताप वय (वय२८, रा. हनुमान नगर, साईबाबा मंदिरा जवळ, केळेवाडी, कोथरुड) असे ताब्यात घेतलेले आरोपीचे नाव आहे. पोलिसांना तो  गांजा अंमली पदार्थ व इतर ऐवज बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना दिसून आला. त्याच्या ताब्यातील सॅकबॅगचे झडतीमध्ये ३ लाख १३ हजार ८४० रुपयांचा १४ किलो गांजा मिळुन आला. याप्रकरणी त्यांच्या विरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एकुण ३ लाख १३ हजार ८४० रुपये किंमतीचा गांजा व इतर ऐवज हस्तगत करुन अटक केले. 

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे व पोलीस अंमलदार लोणीकाळभोर स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करताना अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ला बातमीदारामार्फेत माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest