तीन वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य; मैत्रिणीच्या आजोबाला अटक
पुणे : अवघ्या तीन वर्षांच्या अल्पवयीन मुली सोबत (Pune Crime News) अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची (Pune News) घटना फुरसुंगी येथील आलिशान सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadpsar Police) ५५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
यशवंत काळुराम जाधव (Yashwant Kaluram Jadhav) (वय ५५) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी जाधव आणि फिर्यादी महिला एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. फिर्यादीची तीन वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि आरोपी जाधव याची नात या एकमेकांच्या मैत्रिणी आहेत.
पीडित मुलगी आरोपीच्या नातीसोबत खेळायला त्यांच्या घरी गेलेली होती. त्यावेळी आरोपी जाधव यांनी पीडित मुलीला घराच्या हॉलमध्ये नेले. दरवाजा बंद करून तिचे कपडे काढून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.