Pimpri Chinchwad : वाल्हेकरवाडीत कोयताधाऱ्यांनी तरुणावर केले वार, दोघांना अटक

हटकले या किरकोळ कारणावरून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, हा सारा प्रकार सोमवारी (२६ फेब्रुवारी) चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे घडला आहे

Pimpri Chinchwad Crime

वाल्हेकरवाडीत कोयताधाऱ्यांनी तरुणावर केले वार, दोघांना अटक

वाल्हेकरवाडी : हटकले या किरकोळ कारणावरून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, हा सारा प्रकार सोमवारी (२६ फेब्रुवारी) चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे घडला आहे, या प्रकरणी अरुण काशिनाथ लोकरे (वय ५३, रा.वाल्हेकरवाडी) यांनी चिंचवड पोलीस (chinchwad police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime) 

पोलिसांनी अजय जालिंदर टाक( Ajay Tak)  (रा. चिंचवड), अविनाश सीताराम गायकवाड (Avinash Gaikwad)  (रा. वाकड) यांना अटक केली आहे. यात आकाश अरुण लोकरे (Akash Lokare)  (वय २१) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारी मुलगी तिच्या बहीण व आरोपी हे गप्पा मारत बसली होती.  यावेळी आकाश हा कामावरून घरी येत होता. यावेळी त्याने शेजारी राहणाऱ्या मुलीला तू या पोरांसोबत दारू पीत बसली होती का असे विचारले असता त्याचा राग येऊन आरोपींनी त्यांच्या जवळील कोयत्याने व लोखंडी दांड्याने डोक्यात वार करत गंभीर जखमी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest