युनियन बिब्लिकल सेमिनरी असोसिएशनची फसवणूक
पुणे : बिबवेवाडी येथील (Bibvewadi) युनियन बिब्लिकल सेमिनरी असोसिएशन या संस्थेच्या बँक (Fraud) खात्यामधून १७ लाख ६८ हजार रुपये वेळोवेळी काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस (Crime News) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात (Pune Police) आला आहे. हा प्रकार २९ नोव्हेंबर २०२१ पासून १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत घडला.
प्रवीण क्रिस्टी पॉल (वय ५६, रा. प्रिन्सिपल बंगलो, युबीएसए, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बेंजामिन राज सुंदरमन सायमन (रा. नरेन हिल्स, आझाद नगर, वानवडी), सुशील मधुकर परवले (रा. बिशप कोएड स्कूल, नगर रोड, रामवाडी), गौरव मदन जाधव, प्रशांत मधुकर बनसोड (रा. युपीएस स्टाफ कॉर्टर्स, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रवीण पॉल हे युनियन बिब्लिकल सेमिनरी असोसिएशन या संस्थेमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करतात.
या संस्थेची विविध बँक खात्यांमध्ये सेविंग खाती आहेत. त्यापैकी पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक व्यवहार बंद करण्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत. आरोपी यांनी संगनमत करून त्यांना कोणतेही अधिकार नसताना केवळ स्वतःच्या फायद्याकरता वेळोवेळी १७ लाख ६८ लाख रुपये बँक खात्यातून काढून यूपीएससी संस्थेची फसवणूक केली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय पतंगे करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.