सासूच्या वक्तव्यावरून सुनेचा चाकूने हल्ला
पुणे : सासु-सुना एकमेकींना 'तू नकटी आहेस' असे म्हणल्यानंतर झालेल्या वादातून सुनेने कांदा चिरण्याच्या सुरीने सासूच्या हातावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना येरवडा येथील गणेश नगर मध्ये घडली.(Pune Police) याप्रकरणी सुने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
संध्या अशोक मगर (Sandhya Ashok Magar) (वय ४५, रा. गणेश नगर, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी मालनबाई परशुराम मगर (Malanbai Parashuram Magar) (वय ७५) यांनी फिर्याद दिली आहे. मालनबाई आणि संध्या या एकमेकांच्या सासू-सुना आहेत. त्या एकत्रच राहतात. या दोघी घरामध्ये असताना संध्या ही मालनबाई यांना 'तू नकटी आहेस' असे बोलली. त्यावर मालनबाई यांनी सुद्धा चिडून तिला 'तू पण नकटीच आहेस' असे म्हणाल्या. त्याचा राग आल्यामुळे संध्या हिने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तिच्या हातामध्ये असलेल्या कांदा कापण्याच्या धारदार सुरीने त्यांच्या हातावर मारून गंभीर जखमी केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.