ड्रग्जचा कारखाना उध्वस्त, १६० कोटींचे द्रव रुपातील मेफेड्रोन जप्त
पुणे : डीआरआयच्या पुणे आणि (Pune Crime News) अहमदाबाद विभागांच्या पथकांसह अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसानी छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) कारवाई करीत १६० कोटी रुपयांचे द्रव रूपामधील मेफेड्रोन (Drug) जप्त करण्यात आले आहे. एमएस अँपेक्स मेडिकेम प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या दोन कारखान्यांवर छापा मारत ही कारवाई करण्यात आली. (Crime Branch police)
डीआरआयच्या पुणे आणि अहमदाबाद विभागांच्या पथकांसह अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसानी छत्रपती संभाजी नगर येथून नुकतेच २५० कोटींचे बेकायदा मेफेड्रोन, केटामाइन आणि कोकेन जप्त केले. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचा सूत्रधार आणि कारखान्याच्या मालकासह दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील आणखी एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची निर्मिती आणि साठा केला जात होता. एमएस अँपेक्स मेडिकेम प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या दोन कारखान्यांच्या जागेचा शोध घेण्यात आला. अँपेक्स मेडिकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून द्रवरूपातील १०७ लिटर मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे बाजार मूल्य अंदाजे १६० कोटी रुपये आहे. जप्त केलेले सर्व पदार्थ एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आले आहेत. कारखान्याचा मालक आणि गोदाम व्यवस्थापकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. डीआरआयच्या ऑपरेशनमुळे सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिक युनिट्सचा होत असलेला गैरवापर उजेडात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.