संग्रहित छायाचित्र
पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने एका सराईताला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून दोन बेकायदा पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
निलेश ज्ञानेश्वर भरम (वय ३५, रा. वैष्णवी प्रेस्टीज, आंबेगाव बुद्रुक, हवेली) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आंबेगाव पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर, स्वारगेट, कोंढवा, खडक, बिबवेवाडी, हवेली व पनवेल येथे खुनाचा प्रयत्न, गोळीबार, दरोडा, दरोडा प्रयत्न, खंडणी या सारखे १६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भरम हा दरीपूलाजवळ येणार असून त्याच्याकडे बेकायदा पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला. त्याची अंगझडती घेतली असता ८६ हजार रुपयांचे २ पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे आढळून आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, निखिल जाधव, विजय पवार, नागनाथ राख, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, अमोल सरडे, संजय आबनावे, प्रमोद कोकणे, व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.