संग्रहित छायाचित्र
पुणे : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (live-in Relationship) राहणाऱ्या तरुणीने वेगळीकडे राहायला सुरुवात केल्यानंतर चिडलेल्या तरुणाने तिचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करीत बदनामी आणि विनयभंग (molestation)केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police)तरुणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एक ऑगस्ट २०२३ ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान घडला.
अनिल कुमार सिद्धनाथ झा (Anil Kumar Siddhanath Zaa)असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी अनिल कुमार हे दोन मागील दोन वर्षांपासून लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत होते. ही महिला ऑगस्ट महिन्यापासून त्याच्यापासून वेगळी राहत होती. त्यानंतर आरोपीने तिला वारंवार फोन करून मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच ती काम करीत असलेल्या ऑफिसच्या सुपरवायझरसह तिच्या सहकारी कर्मचारी मित्रांना मोबाईलवर तिचे अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर पाठवला. त्यावर अश्लील कमेंट केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.