बाबू मिरेकर टोळीवर लावला मोक्का
पुणे : हडपसर परिसरातील बाबू मिरेकर टोळी विरोधात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
बाबू नामदेव मिरेकर (वय ५४, रा. वैदुवाडी, हडपसर) या टोळीप्रमुखासह आकाश हनुमंत कांबळे (वय २०), अमन नवीन शेख (वय २३ रा. गोसावी वस्ती, हडपसर), सरताज नबीलाल शेख (वय २६, रा. वैदवाडी, हडपसर), सनी रावसाहेब कांबळे (वय २३, रा. मिरेकर वस्ती, वैदुवाडी), रोहित शंकर हनुमते (वय २२, रा. नवीन म्हाडा बिल्डिंग, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे.
तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या आरोपींनी १७ सप्टेंबर रोजी मिरेकर वस्तीमध्ये एका तरुणाचा खून केलेला होता. ही संघटित टोळी असून लोकांना घातक शास्त्राने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे,जबरी चोरी करणे, नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, खंडणी स्वरूपात पैसे उकळणे, छोटे व्यावसायिक दुकानदार आणि पथारीवाल्यांना दमदाटी करून फुकट वस्तू घेणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या टोळी विरोधात दाखल आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.