तरुणीला रस्त्यात गाठत विनयभंग
पुणे : रस्त्यावरून चालत जात असलेल्या तरुणीच्या समोर येऊन स्वतःची पॅन्ट आणि अंडरवेअर काढून अश्लील हातवारे करून तिचा विनयभंग (molestation) करण्यात आला. ही घटना मुंढवा येथील घोरपडी गावात असलेल्या विकास नगरमध्ये घडली. (Pune Crime News)
पोलिसांनी जेम्स अँथनी (James Anthony) (रा. मुंढवा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी रस्त्याने रात्री एकच्या सुमारास चालत चाललेली होती. त्यावेळी आरोपी तिच्यासमोर आला. त्याने स्वतःची पॅन्ट आणि अंडरवेअर काढली आणि या तरुणीकडे पाहून अश्लील हातवारे करायला सुरुवात केली. घाबरून ही तरुणी तिथून पळून गेली आणि स्वतःचा बचाव केला. याप्रकरणी मुंढवा पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.