संग्रहित छायाचित्र
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून होत असलेल्या छळाला कंटाळून २९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapith Police) ठाण्याच्या हद्दीतील चिंतामणी गार्डन, आंबेगाव पठार या ठिकाणी घडली. (Pune Crime News)
प्रियांका विनायक पाटील (Priyanka Vinayak Patil) (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती विनायक अनंतराव पाटील (वय ३९), वनिता मोरे (रा. कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुकाराम खंडू कदम (वय ६६, रा. नवा मोदीखाना, कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. प्रियंका आणि विनायक यांचा १ जुलै २०१४ रोजी विवाह झाला होता. विनायक पाटील हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यावरून तो तिला वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ करीत होता. तसेच लग्नामध्ये १५ लाख रुपयांचा खर्च झालेला आहे. हे पैसे मला परत कर असे म्हणत तिचा छळ करत होता. तिची ननंद वनिता हीने देखील तिचा छळ केला. या छळाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केली.