संग्रहित छायाचित्र
पुणे : हार्डवेअरचे दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराने दहा वर्षांच्या अल्पवयीन (Pune Crime News) मुलीचा तिच्या घरामध्ये घुसून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी महिपती कोंडेकर (Shivaji Mahipati Kondekar) (वय ५५, रा. क्रॉस ओव्हर काऊंटी, धायरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३७ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी कोंडेकर हा धायरी गावात पूजा कलेक्शन आणि समर्थ हार्डवेअर नावाचे दुकान चालवतो. आरोपी १ नोव्हेंबर रोजी पीडित महिलेच्या घरी गेला.
किल्ली ठेवण्याच्या बहाण्याने त्याने दहा वर्षांच्या मुलीला दरवाजा उघडायला भाग पाडले. घरामध्ये गेल्यानंतर त्याने तिच्या गालाचा मुका घेतला. त्यानंतर तिने विरोध केल्यावर देखील त्याने वारंवार हे कृत्य केले आणि तिला अश्लील स्पर्श करीत विनयभंग केलं. याबाबत तिने आईला माहिती दिल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.