डेटिंग ॲपवरील मैत्रिणीने तरुणाला लुबाडले
पुणे : डेटिंग ॲप वर (Dating app) ओळख झाल्यानंतर तरुणीने तरुणाला भेटायला (Pune Crime News) बोलवून हॉटेल रूम बुक करायला लावत ९० हजार रुपयांना साथीदाराच्या मदतीने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्यात एका अनोळखी तरुणीसह तिच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
याप्रकरणी ३६ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार पुणे गेट हॉटेल नऱ्हे या ठिकाणी घडला. फिर्यादी तरुण नऱ्हे येथील सन युनिव्हर्स सोसायटीमध्ये राहण्यास आहे. या तरुणाने सिकिंग एडवेंचर या डेटिंग ॲप वर लॉगिन केलेले होते. त्या डेटिंग ॲपवर त्याची आरोपी तरुणीची ओळख झाली. या तरुणीने तिचे फोटो टेलिग्रामवर फिर्यादीला पाठवले. तुला भेटायचे आहे असे सांगितले. त्यानुसार या तरुणाने नऱ्हे यातील पुणे गेट हॉटेलमधील रूम बुक केली.
आरोपी तरुणी या ठिकाणी आली. त्याच्यासोबत गप्पा मारत असताना तिने पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत बारा हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला लावले. त्यानुसार या तरुणाने १२ हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर या तरुणीने त्याच्याकडे पुन्हा ३८ हजार रुपये ट्रान्सफर करण्याची मागणी केली. त्यावेळी या तरुणाने तिला पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी तिने तिच्या साथीदाराला रूममध्ये बोलावले. हा तरुण रूममध्ये आल्यानंतर त्याने फिर्यादीत तरुणाला मारहाण केली. जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. तसेच त्यांची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. अशाप्रकारे एकूण ९० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत त्यांना मारहाण करून दोघेही तिथून पसार झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजूरकर करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.