संग्रहित छायाचित्र
पुणे : हडपसरच्या रॉयल एनफिल्ड शोरूमच्या (Royal Enfield) कॅश काऊंटरवरील तीन लाख रुपये सिक्युरिटी गार्डने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद कुमार (वय २९, रा. उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. इजहार काझी (वय ३०, रा. रास्ता पेठ) यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद कुमार हा हडपसर मधील शेवाळवाडी येथील प्लॅटिनम ऑटो या रॉयल इन्फिल्ड दुचाकीच्या शोरूम मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तर, काझी हे प्लॅटिनम ऑटोमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून काम पाहतात. आरोपी प्रमोद कुमार याने कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापकांची नजर चुकवून कॅश काऊंटरमध्ये ठेवलेले तीन लाख रुपये चोरी करून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक गांधले करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.