किरकोळ वादातून पळवून नेली कार
पुणे : कारचा धक्का लागल्याच्या कारणामधून झालेल्या वादातून कार (Car) पळवून नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ( Chatu: Shringi police station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बाणेर (Baner) रस्त्यावरील पंपावर घडली.
याप्रकरणी दुचाकी क्रमांक एमएच १२ आरझेड ८०४३ वरील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुनील कोळेकर (वय २१, रा. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार कोळेकर हे त्यांच्या कार मधून मित्रांसोबत जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा धक्का आरोपींच्या दुचाकीला लागला. त्यावरील एक मुलगा व मुलगी खाली पडली. फिर्यादी कोळेकर यांनी खाली उतरून त्यांना काही लागले आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी कोळेकर यांची कॉलर पकडून दमदाटी केली.
दरम्यान, आणखीन दोघेजण त्या ठिकाणी मोटरसायकल वरून आले. त्यांच्या गाडीची चावी काढून घेत अडीच लाख रुपयांची कार जबरदस्तीने चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.