Accident News : पुणे-नगर रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक

अहमदनगर रस्त्यावरील बीरआरटी (Accident News) मार्गात अपघातांचे सत्रच सुरु असल्याचे दिसून येत आहे. आज (सोमवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बीआरटी मार्गात (Pune News) दोन चार चाकींचा जोराची धडक होऊन अपघात झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Mon, 30 Oct 2023
  • 03:05 pm
Accident News : पुणे-नगर रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक

पुणे-नगर रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक

पुणे : अहमदनगर रस्त्यावरील बीरआरटी (Accident News) मार्गात अपघातांचे सत्रच सुरु असल्याचे दिसून येत आहे. आज (सोमवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बीआरटी मार्गात (Pune News) दोन चार चाकींचा जोराची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने नगरकडे जाणाऱ्या चार चाकीच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या चारचाकीला जोराची धडक बसली. यात दोन्ही गाड्यांचे वाहन चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाहनांच वेग चांगलाच असल्याने दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी सोमनाथ शिंदे आणि श्रीराम शिंदे यांनी दिली.

अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. जीवीतहानी झाली नसल्याचे माहिती समोर आली आहे. या बाबत विमाननगर पोलिसांकडून अधिक माहिती देण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest