रक्षाबंधनचा आनंद काळाने घेतला हिरावून; खडकवासला धरणात कोसळली कार, मुलीचा दुर्दैवी मृत्यू

सर्वत्र रक्षांबनधन सण आनंदात साजरा केला जात आहे. अशातच पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कारचे टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट खडकवासला धरणात कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत काल बुधवार (दि. 30) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 31 Aug 2023
  • 09:58 am
Car falls Khadakwasla dam

रक्षाबंधनचा आनंद काळाने घेतला हिरावून; खडकवासला धरणात कोसळली कार, मुलीचा दुर्दैवी मृत्यू

सर्वत्र रक्षांबनधन सण आनंदात साजरा केला जात आहे. अशातच पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कारचे टायर फुटून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट खडकवासला धरणात कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत काल बुधवार (दि. 30) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. रक्षाबंधन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

संस्कृती प्रदीप पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे.) असे अपघात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. नांदेड सिटी येथे राहणारे प्रदीप पवार हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रक्षाबंधनासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न,मुलगी संस्कृती व बहीण सुनीता नारायण शिंदे यांसह कारने पानशेत या आपल्या मुळ गावी जात होते. दरम्यान कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ अचानक पवार यांच्या कारचे उजव्या बाजूचे टायर फुटल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांचा घटनास्थळी धाव घेतली व कारमधील प्रदीप पवार, अर्चना पवार, प्रद्युम्न पवार व सुनीता शिंदे यांना वाचवले मात्र संस्कृती गाडीतच अडकून राहिली त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. 

मुळशी व सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीए अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री उशिरा तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest