Pune : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवला; वडगावशेरीतील नागरीकांना मिळाला मोठा दिलासा

नगर रस्त्यावर (Nagar Road) असलल्या बीआरटी (BRT route) मार्गामुळे सातत्याने अपघात (accident) होत होते. त्यामुळे हा मार्ग काढून टाकावा अशी मागणी सातत्याने करन्यात येत होती. त्यामुळे महापालिका (PMC) आता नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाचा अभ्यास करणार आहे.

BRT

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवला; वडगावशेरीतील नागरीकांना मिळाला मोठा दिलासा

पुणे: नगर रस्त्यावर (Nagar Road) असलल्या बीआरटी (BRT route) मार्गामुळे सातत्याने अपघात (accident) होत होते. त्यामुळे हा मार्ग काढून टाकावा अशी मागणी सातत्याने करन्यात येत होती. त्यामुळे महापालिका (PMC) आता नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाचा अभ्यास करणार आहे. यासाठी गोखले इन्स्टिट्यूटवर सविस्तर अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हा अहवाल सादर झाला असून त्यानुसार बुधवारी रात्री हा मार्ग काढण्यास महापालिकेच्या पथ विभागाने सुरुवात केली आहे. (Pune News)

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील बीआरटी मार्गच काढून टाकण्यात यावा. अशी भुमिका वडगावशेरीचे  आमदार सुनील टिंगरे यांनी घेतली होती. तर माजी उपमहापौर डाॅ. सिध्दार्थ धेंडे यांनी सर्वसामान्यांसाठी असलेला बीआरटी मार्ग काढून नये असे त्यांचे मत होते.  त्यामुळे बीआरटी मार्ग काढावा की ठेवावा, यावरुन वडगावशेरी मतदार संघात चांगलाच राजकीय आखाडा रंगला आहे. यावादात माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवारांनी उडी घेतली होती.. तसेच स्थानिक नागरिकांनी देखील सोशल माध्यामांवर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. 

गोखले संस्थेने पुणे-नगर महामार्गावरील पर्णकुटी,येरवडा ते फिनिक्स मॅाल, विमाननगर या टप्प्यातील मेट्रो कामामुळे बंद पडलेल्या BRT चे अवशेष काढण्याचा अहवाल महापालिकेला सादर केला.  वारंवार होणारे अपघात, वाहतूक पोलीसांनी केलेली सूचना, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संघटना तसेच नागरिकांची मागणीचा विचार करण्यात आला. त्यानुसार  या टप्प्यातील BRT चे तुटलेले रेलिंग आणि मेट्रो कामामुळे चालू करता न येणारे धोकादायक अवशेष काढण्याचे काम महापालिकेकडून  सुरू करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील समस्यांवर बैठक घेतली होती.  त्या वेळी हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला होता. आमदार सुनील टिंगरे यांच्या मागणीनुसार पवार यांनी या रस्त्याची पाहणी करण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार येरवडा ते खराडी जकात नाक्यापर्यंत या मार्गाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यांनतर आता बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला जाईल अशी चर्चा रंगली होती. मात्र महापालिका हा मार्ग काढावी की ठेवावा, यावर अभ्यास करणार आहे. यामुळे खरच बीआरटी मार्ग काढला जाणार की केवळ अभ्यास केला जाणार अशी चर्चाही वाढवशेरीत रंगली होती. 

बिआटीबाबत अभ्यास करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटची नियुक्ती केली होती. इन्स्टिट्यूटने अहवाल सादर केला. त्यानूसार कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest