पुणे-दौंड विभागात रेल्वे सुसाट! ताशी 130 किमी वेगाने प्रवासी गाड्या धावण्याची सुरुवात

सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी पुणे-दौंड विभागादरम्यान प्रवासी गाड्या कमाल मान्य वेग मर्यादा130 किमी प्रतितास वेगाने धावू लागल्या. गाडी क्र. 18520 लोमन्या टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही 130 किमी प्रतितास वेगाने धावणारी पहिली ट्रेन ठरली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Tue, 29 Aug 2023
  • 05:28 pm
trains speed : पुणे-दौंड विभागात रेल्वे सुसाट! ताशी 130 किमी वेगाने प्रवासी गाड्या धावण्याची सुरुवात

ताशी 130 किमी वेगाने प्रवासी गाड्या धावण्याची सुरुवात

सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी पुणे-दौंड विभागादरम्यान प्रवासी गाड्या कमाल मान्य वेग मर्यादा130 किमी प्रतितास वेगाने धावू लागल्या.  गाडी क्र. 18520 लोमन्या टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही 130 किमी प्रतितास वेगाने धावणारी पहिली ट्रेन ठरली.  गाडी पुण्याहून 10.42 वाजता निघाली आणि दौंडहून 11.43 पास झाली.  पुणे-दौंड दरम्यानच्या एकूण 76 किलोमीटर अंतरात ट्रेनने धावण्याचा 5 मिनिटांचा वेळ वाचवला. 

उद्या आणखी 2 गाड्या क्र.  22944 इंदूर - दौंड एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. 11301 मुंबई - बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ताशी 130 किमी वेगाने धावण्याची योजना आखण्यात आली आहे.  अशा प्रकारे पुणे-दौंड दरम्यान एलएचबी रेक असलेल्या सर्व 22 जोड्या गाड्यांचा वेग हळूहळू 130 किमी प्रतितास केला जाईल.  यापूर्वी या विभागात सर्व गाड्या ताशी 110 किमी वेगाने धावत होत्या.

हा विभाग ताशी 130 किमी वेगाने धावण्यासाठी ट्रॅक तयार करणे, ओएचई नियमन आणि सिग्नलिंगची कामे यासारखी तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.  आता सर्व रोलिंग स्टॉक आणि इंजिन  130 किमी प्रतितास वेगाने या विभागात  जास्तीत जास्त 130 किमी ताशी या वेगाने धावतील आणि धावण्याचा वेळ वाचेल.  सर्व आवश्यक सुरक्षेच्या बाबींवर योग्य लक्ष देऊन या विभागाचा वेग वाढवला आहे.

तत्पूर्वी मुख्य सुरक्षा आयुक्त/मध्य विभाग श्री मनोज अरोरा, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री नरेश लालवाणी, पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने या विभागाची तांत्रिक पाहणी केली आणि सुधारणा सुचवल्या. पुणे विभागाने अडथळे दूर केले आणि आज कमाल मान्य वेग मर्यादा 130 किमी प्रतितास वेगाने पहिली ट्रेन धावली. यामुळे प्रवासी गाड्यांची धावण्याची वेळ कमी होईल आणि गाड्यांची एकूण वक्तशीरता सुधारेल.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest