PMC News : थकबाकीदारांच्या मालमत्त सील करण्याचा महापालिकेचा धडाका सुरुच

महापालिकेच्या मिळकत कर (Income Tax) आकारणी आणि कर संकलन विभागाने थकबाकीदार मिळकतधारकांना झटका (PMC News) देत मालमत्ता थेट सील करण्याचा धडका (Pune News) सुरुच ठेवला आहे. आज (बुधवारी) कोथरूड येथील चॉइस हेल्थ क्लबची इमारत तसेच पेठ मंगळवार येथील आरोळे कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ची मालमत्ता महापालिकेने थेट सील केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Wed, 1 Nov 2023
  • 04:41 pm
PMC News : थकबाकीदारांच्या मालमत्त सील करण्याचा माहापालिकेचा धडाका सुरुच

थकबाकीदारांच्या मालमत्त सील करण्याचा महापालिकेचा धडाका सुरुच

कोथरूड, मंगळवारी पेठेतील ४ कोटी रुपये थकबादारांच्या मिळकती केल्या सील

पुणे : महापालिकेच्या मिळकत कर (Income Tax) आकारणी आणि कर संकलन विभागाने थकबाकीदार मिळकतधारकांना झटका (PMC News) देत मालमत्ता थेट सील करण्याचा धडका (Pune News) सुरुच ठेवला आहे. आज (बुधवारी) कोथरूड येथील चॉइस हेल्थ क्लबची इमारत तसेच पेठ मंगळवार येथील आरोळे कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ची मालमत्ता महापालिकेने थेट सील केली आहे. या मिळकतदारांची महापालिकेडे तब्बल चार कोटी रुपयांची थकबाकी आहे. नोटीस पाठविल्यानंतर महापालिकेने या मिळकती सील केल्या आहेत. महापालिकेच्या मिळकत कर आकारणी आणि कर संकलन विभागाने थकबाकीदार मिळकतधारकांना झटका देत मालमत्ता थेट सील करण्याचा धडका सुरुच ठेवला आहे. आज (बुधवारी) कोथरूड येथील चॉइस हेल्थ क्लबची इमारत तसेच पेठ मंगळवार येथील आरोळे कन्स्ट्रक्शन प्रा.लि. ची मालमत्ता महापालिकेने थेट सील केली आहे.

मिळकतींचे कर भरण्यासाठी महापालिकेकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. करात सवलत देखील दिली जात आहे. मात्र अनेकदा विविध कारणे देत पुणेकर कर भरण्याबाबत उदासीनता दाखवित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून कर वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीस पाठविण्याची मोहिम हाती घेतली होती. परंतु पाठविलेल्या नोटीशांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने थकबाकी दारांच्या मिळकती सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.  उप आयुक्त तथा कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार, अस्मिता तांबे, रविंद्र धावरे, सुनिल मते आदी प्रशासन अधिकारी, विभागीय निरीक्षक बळीराम झोंबाडे यांनी मिळकती सील करण्याची कारवाई केली. कोथरूड आणि मंगळवार पेठे येथील अनुक्रमे ४ कोटी १० लाख रुपये आणि 4 कोटी 28 लाख 32 हजार 885 रुपये एवढी थकबाकी असल्याने यांची संपूर्ण इमारत सिल करण्यात आली.

पालिकेने जप्त केलेल्या मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मालमत्तांच्या लिलावामधून कोट्यवधी रुपयांचा कर पालिकेला मिळणार आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात २०२ मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून यामधून पालिकेच्या तिजोरीत ५७ कोटी रुपये जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील या लिलावानंतर लिलावाचा दूसरा टप्पा देखील राबविला जाणार आहे. दरम्यान, चालू वर्षात पालिकेला मिळकतकरामधून १,४४२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न २ हजार ४०० कोटी गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून मालमत्ता धारकांकडून कर वसुली करण्यासोबतच नव्याने कर आकारणी आकारणी करण्यावरही भर देण्यात आला आहे.

पालिकेने यंदा कर आकारणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फौज जुपली आहे. काही करुन ठरविलेले उद्दिष्ट गाठले जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांना कर भरावाच लागणार आहे. पालिकेकडून कर वसुली करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून मिळकत कर विभाग प्रमुखांनी खात्यातील विभागीय पेठ निरीक्षकांना  थकबाकी असलेल्या मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. प्रत्येक पेठ निरीक्षकाला दर दिवशी १ म्हणजे प्रत्येकाकडून महिन्याला किमान ३० व्यावसायिक मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यासोबतच विभागीय निरीक्षक आणि पेठ निरीक्षक यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्वांनी मिळून किमान ५० मिळकती सील कराव्यात असे अपेक्षित आहे.

पुणे महानगरपालिकेन सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी लॉटरी योजना राबविली होती. या योजनेतील विजेत्या मिळकतधारकांना उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करुन गौरविण्यात आले होते. पुणेकरांनी कर भरावा  यासाठी पालिका विविध योजना राबवित असते. सध्या करात ४० टक्के सवलत दिली जात आहे. त्यापलिककडे पालिकेकडे कोणतीही अभय योजनेसारखी योजना राबविली जाणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

थकाबाकीदारांनी कर भरण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच वेळेत थकबाकी भरली नाही. अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जत्प करण्याची कारवाई केली जात आहे. त्यानुसार आज कोथरुड आणि मंगळवार पेठेतील चार कोटी रुपये थकबाकी असलेल्या मिळकती सील केल्या. शहरात मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरुच राहणार आहे.

 - अजित देशमुख, आकारणी व कर संकलन विभाग प्रमुख, महापालिका.

 

31 ऑक्टोबर 2023ची थकबाकी वसूली अहवाल :-

भेट दिलेल्या एकूण मिळकतींची संख्या - 825

नोटीस बजावलेल्या मिळकर्तीची संख्या - 370

सिलिंग कारवाई दरम्यान पुढील तारखेचे प्राप्त चेकची संख्या - 2

कारवाई दरम्यान प्राप्त रक्कम - 4 कोटी 33लाख 19 हजार 532

सील केलेल्या मिळकतींची संख्या-  46

सील केलेल्या मिळकर्तीची थकबाकी रक्कम-  2 कोटी 34 लाख 649

एकूण सील केलेल्या मिळकतींची संख्या-  1,882

एकूण सील केलेल्या मिळकतींची थकबाकी रक्कम - 102 कोटी 94 लाख 96 हजार 193

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest