सततच्या खोदकामाला पुणेकर वैतागले

मोमीनपुरा येथील रस्ता खोदताना तेथील सर्व कामे एकदाच करावीत, वारंवार रस्त्याचे खोदकाम करून नागरिकांचा पैसा खर्च करून त्यांनाच त्रास देऊ नये. अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उपसले जाईल, अशा विनंतीचे स्थानिकांनी रस्त्यावर जागोजागी बॅनर लावले आहेत. त्यावर प्रशासनाने येथील रस्त्याचे खोदकाम थांबवले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 1 Sep 2023
  • 12:16 pm
PMC continuous digging

नवी ड्रेनेज लाइन बसवण्याची मागणी

नवी ड्रेनेज लाइन बसवण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा दिल्याने मोमीनपुरा परिसरातील खोदकाम थांबवले

महेंद्र कोल्हे/ नितीन गांगर्डे

मोमीनपुरा येथील रस्ता खोदताना तेथील सर्व कामे एकदाच करावीत,  वारंवार रस्त्याचे खोदकाम करून नागरिकांचा पैसा खर्च करून त्यांनाच त्रास देऊ नये. अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उपसले जाईल, अशा विनंतीचे स्थानिकांनी रस्त्यावर जागोजागी बॅनर लावले आहेत. त्यावर प्रशासनाने येथील रस्त्याचे खोदकाम थांबवले आहे.

रस्त्यात पुन्हा-पुन्हा केल्या जाणाऱ्या खोदकामाला कंटाळून मोमीनपुरा परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खोदकाम प्रक्रियेला वैतागून मोमीनपुरा येथील नागरिकांनी एकदाच रस्ता खोदून त्यावरील सर्व कामे एकदाच पूर्ण करण्याच्या विनंतीचे पोस्टर रस्त्यावर ठिकठिकाणी लावले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासन एकच रस्ता वारंवार वेगवेगळ्या कारणांसाठी खोदल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मोमीन पुऱ्यातील घोरपडी पोलीस चौकी ते मीठगंज पोलीस चौकी या दोन्हींच्या मधला रस्त्यावर मे २०२३ मध्ये २४ बाय ७ या योजनेअंतर्गत काम सुरू होते. या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी प्रशासनाने खोदकाम सुरू केले होते. जलवाहिनी टाकण्याचे काम झाल्यावर पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत करण्यात येणार होता. मात्र येथील रस्त्यावर असलेली ड्रेनेजची लाईन वारंवार तुंबत आहे. ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक महागडी यंत्रे सफाईसाठी आणली होती. मात्र त्याचा कायमस्वरूपी समस्येचे निराकरण करण्यात महानगरपालिका प्रशासनास यश आले नाही.

येथील रस्त्यावरच्या ड्रेनेज तुंबण्यावर छोटी छोटी मलमपट्टी न करता थेट या समस्येवर मोठ्या आकाराची ड्रेनेज लाईन टाकावी आणि कामयमस्वरूपी येथील समस्या निकाली काढावी अशी येथील नागरिकांनी मागणी केली. त्यासाठी २४ बाय ७ योजनेतून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम झाल्यावर रस्ता पुन्हा दुरुस्त केला जाईल आणि ड्रेनेज लाइनसाठी पुन्हा त्याचे खोदकाम करण्यात येईल यामध्ये पुन्हा पुन्हा खोदकाम करून नागरिकांनी कररूपी भरलेला पैसा हकनाक वाया जाईल. त्याचा नागरिकांना त्रास होईल. यापेक्षा दोन्हीही कामे एकसोबत करण्यात यावे अशी विनंती स्थानिकांनी प्रशासनास केली. त्यांनी येथील रस्त्यावर जागोजागी महानगरपालिका प्रशासनाला बॅनर लावून विनंती केली आहे. सुरू असलेले काम तत्काळ थांबवा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा प्रशासनास आंदोलनाचे शस्त्र उपसण्याचा इशारा दिला.

स्थानिक नागरिक गणेश कल्याणकर यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना सांगितले की, येथील रस्त्यावरील ड्रेनेजची लाईन जागोजागी रस्त्यावर तुंबते. तिचे सगळे प्रदूषित पाणी रस्त्यावर पसरते. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरते. तात्पुरता उपाय करण्यापेक्षा नवीन ड्रेनेज वाहिनी टाकणे आवश्यक आहे. याची मागणी अनेकदा महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. अशातच इथे २४ बाय ७ चे काम रस्त्यावर सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाला विनंती आहे त्यांनी दोन्ही काम एकसोबत पूर्ण करावे आणि नागरिकांचे पैसे वाचवावे. अशी विनंती केली आहे. प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देताच त्यांनी काम थांबवले आहे. लवकरच दोन्ही काम एकसोबत करणार असल्याचे त्यांनी सांगितले असेही कल्याणकर म्हणाले.

याबाबत महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या परिसरातील मलनिस्सारण वाहिनी जुनी झाली आहे. तिच्या कामासाठी निधीची तरतूद झाली आहे. पावसाळा संपला की येथील काम करण्यात येणार आहे.

२४ बाय ७ रस्त्यावरील मलनिस्सारण वाहिनी जुनी असून ती नादुरुस्त आणि कोंडलेली आहे. त्यातून पाणी बाहेर येऊन २४ बाय ७ च्या कामाला अडथळा ठरत आहे.  मलनिस्सारण वाहिनी  दुरुस्त करण्याचे संबंधित विभागाला कळवले आहे. त्यांनी २५० मीटरची वाहिनी नवीन टाकावी लागेल असे सांगितले. साधारण दोन ते अडीच कोटींचे काम आहे. त्यासाठी निधीची अडचण होती त्याची मंजुरी झाली आहे. मलनिस्सारण वाहिनीचे काम झाल्यावर २४ बाय ७ चे काम करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता नंदकिशोर जगताप यांनी 'सीविक मिरर' ला दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest