Pune Metro : महामेट्रोच्या स्वारगेट हबच्या कामामुळे हवेचे प्रदूषण, २ दिवसांत उपाययोजना करा अन्यथा काम बंद

शहरातील मोठ्या प्रमाणात मोठी बांधकामे सुरु आहेत. त्याठिकाणी पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याने हवा प्रदूषण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी राज्य प्रदूषण मंडळाच्यावतीने दिलेल्या निर्देशानुसार उपाययोजना न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

Pune Metro : महामेट्रोच्या स्वारगेट हबच्या कामामुळे हवेचे प्रदूषण, २ दिवसांत उपाययोजना करा अन्यथा काम बंद

महामेट्रोच्या स्वारगेट हबच्या कामामुळे हवेचे प्रदूषण, २ दिवसांत उपाययोजना करा अन्यथा काम बंद

महापालिका आयुक्तांनी दिला मेट्रो प्रशासनाला इशारा

पुणे: शहरातील मोठ्या प्रमाणात मोठी बांधकामे सुरु आहेत. त्याठिकाणी पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याने हवा प्रदूषण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी राज्य प्रदूषण मंडळाच्यावतीने दिलेल्या निर्देशानुसार उपाययोजना न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. महामेट्रोच्यावतीने स्वारगेट येथे हब उभारणीच्या कामाच्या ठिकाणी मंडळाच्या निर्देशानुसार उपाययोजना केल्या गेल्या नसल्याची तक्रारी आल्यानंतर महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना येत्या दोन तीन दिवसांत कामाच्या ठिकाणी २५ फूट पत्रे आणि हिरवी नेट लावावी अन्यथा काम थांबविण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना श्वासनाचे त्रास सहन करावा लागत आहे. हिवाळ्यात वाहनांतील इंधनामुळे तसेच धुलीकणांमुळे प्रदूषणात भर पडून आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. देशातील मुख्य शहरामंध्ये हवा प्रदूषणाची मोठी डोकेदुखी ठरवू लागली आहे. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठल्यानंतर मुंबईत देखील हवा प्रदूषण वाढले आहे. याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने सर्वच राज्य सरकारांना हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश आणि मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने गेल्या आठवड्यात आदेश काढून या उपाययोजनांची तसेच मार्गदशर्क तत्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने मागील आठवड्यात तसे पत्र काढुन सर्वच बांधकाम व्यावसायीक, प्रकल्पांना नोटीसेस पाठवून बांधकामांच्या ठिकाणी वरील निर्देशानुसार केलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती मागविली आहे.

दरम्यान शहरात फेज एक, दोन आणि तीनचे काम सुरू आहे. फेज १ अंतर्गत पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम सुरू आहे. या अंतर्गत स्वारगेट येथे मेट्रो हब उभारण्यात येत असून मेट्रो स्टेशनमध्ये बहुमजली व्यावसायीक इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी शहरातील सर्वात गर्दीचा जेधे चौक असून पीएमपी आणि एसटी स्थानकही येथेच असल्याने दररोज लाखांहून अधिक नागरिकांची ये जा सुरू असते. लगतच सारसबाग, नेहरू स्टेडीयम असून येथेही नागरी वावर मोठ्या प्रमाणावर असतो. मेट्रो हबच्या ठिकाणी बांधकामासाठीचा आरएमसी प्लांटही असून खडी, सिमेंट वाहून आणणार्‍या वाहनांची संख्याही मोठी असते. कामाच्या ठिकाणी उंच पत्रे लावण्यात आले आहेत, परंतू हिरवी नेट लावण्यात आलेली नाही. या भव्यदिव्य प्रोजेक्टसाठी महामेट्रोने पर्यावरणीय दृष्टीने काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून तातडीने हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पत्रे तसेच ग्रीन नेट लावून घेण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत या उपाययोजना न केल्यास मेट्रोचे काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest